Home Breaking News टिटवी परिसरात वाघाचा धुमाकूळ, गुराख्यावर केला जिवघेणा हल्ला

टिटवी परिसरात वाघाचा धुमाकूळ, गुराख्यावर केला जिवघेणा हल्ला

8

घाटंजी प्रतिनिधी अमोल नडपेलवार

टिटवी परिसरात वाघाचा धुमाकूळ, गुराख्यावर केला जिवघेणा हल्ला

घाटंजी:टिटवी परिसरात वाघाने धुमाकूळ घातला असून आज गाईची राखण करणाऱ्या टिटवी येथील कर्णुजी पेंदोर वय ६० वर्ष जिवघेणा हल्ला करून जखमी केले आहे. कर्णुजी रोज गाई घेऊन जंगल परिसरात चराईला जात होता, त्याच्यावर अनपेक्षितपणे आज अडीच वाजता वाघाने हल्ला केला त्या पंचक्रोशीतील नागरीक प्रचंड दहशतीमध्ये आहे, विशेष म्हणजे एक वाघ आणि दोन वाघिन आहे. जेमतेम पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी, मजूरांची शेतीच्या कामासाठी लगबग सुरू झाली होती. पण वाघाच्या दहशती मुळे शेतकरी, शेतमजूर जिव मुठीत घेऊन शेतात काम करीत आहेत. या साठी वनविभागाने या वाघांचा तात्काळ बंदोबस्त करून टिपेश्वर अभयारण्यात सोडावे अन्यथा या परीसरातील नागरिक वनविभागाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या मानसिकतेत दिसत आहे. आज गुराख्यावर ही वेळ आली आहे कुटुंब प्रमुख जिवाने गेला तर कुटुंबाची काय अवस्था होते हे सगळ्यांनाच माहीत आहे. गावातील काही लोक हल्ल्याच्या वेळी खुप आवाज झाल्याने नागरिक धाऊन आले.म्हणून कर्णूजी पेंदोर याला अत्यवस्थ अवस्थेत उचलून यवतमाळ सरकारी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पुन्हा कुणावर वाघांचा हल्ला होऊ नये यासाठी वनविभागाने वेळीच उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरीका कडून होत आहे.

Copyright ©