जोडमोहा नदीच्या पुराने हजारो हेक्टर शेतजमिनीवरील पिके पाण्याखाली
पाण्याचा तांडवअजुनही सुरुच
कळंब तालुक्यातील जोडमोहा परिसरातील गावातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली असून, रात्री पासुन व सकाळी ज़ोरदार पावसाने हजेरी लावली जोडमोहा येथुन वाहनारी वाघाड़ी नदी दुथडी भरुन वाहत असल्यमुळे नदीच्या आजूबाजुला असलेले शेतामध्ये पाणी घुसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी येणारा घास नियती हिरावू पाहत असल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहेत, त्यामुळे पिके चांगली होण्यासाठी पावसाने उघडझाप देण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे,मागील आठवडाभरापासून चालू असलेला पाऊस थांबयचा काही नाव घेत नाही आहे,सतत पाऊस येत असल्यामुळे परिसरातील वाधाडी नदीसह अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर येऊन अनेक शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेली असून,सोयाबीन तथा कापसाचे पीक सडण्याच्या मार्गावर आहेत,मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, पावसामुळे पीकही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे,शिवाय उत्पन्नात घट येण्याची भीती सुद्धा शेतकऱ्यांना सतावत आहे,त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे परिसरामध्ये कितीतरी अल्पभूधारक शेतकरी आहे ज्यांचा कुटुंबाचं आर्थिक नियोजन सगळ्याप्रकारे विस्कळीत झालेला आहे तरी प्रशासनाने सदर नुकसान भरपाईचे त्वरित पंचनामा करावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी सदर वाघाडी नदी याचे रुंदीकरण आणि खोलीकरण यासाठी प्रस्ताव पाठवलेले असून सुद्धा प्रशासनाला जाग आलेला नाही अशी भूमिका जोडमोहा येथिल शेतकरी यांनी पत्रकारशक्ती शी बोलतानी सांगिताले आहे त्यामुळे संबंधित विभागाने नुस्कान ग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी पुरग्रस्त शेतकरी काशिनाथ लखुजी आडे सुभाष लखुजी आडे मुकेश नथुजी लिलारे किसन लिलारे परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.



