सदोबा सावळी प्रतिनिधी आसिफ खान
स्फोट,गरोदर महिलेसह आठ वर्षाच्या मुलीचा ही होरपळून मृत्यू
सावळी सदोबा: आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा लगत असलेल्या मौजा आयता या गावांमध्ये आज सकाळी ८ वाजताच्या दरम्यान घरगुती गॅसने पेट घेतला असता,विनोद जयस्वाल हा बाहेरगावी गेला असल्याने घरामध्ये गरोदर महिला व पाच वर्षांची मुलगीच होती,घरामध्ये असलेल्या गरोदर महिला व आठ वर्षाची मुलगी यांचा आगीमुळे जागीच होरपळून मृत्यू झाला,मोठ्या प्रमाणात आग लागली,आगीने रुद्ररूप धारण केले होते,ज्या घरामध्ये आग लागली होती की,त्यामध्ये गरोदर महिलांची व लहान मुलगी या कुणालाही बाहेर येता आले नाही,तेवढ्या वेळामध्ये गॅसचा स्पोर्ट झाल्याने,गरोदर महिला सौ.काजल विनोद जयस्वाल वय ३०वर्ष,व मुलगी परी विनोद जयस्वाल वय ८ वर्ष या दोघींचा घरामध्येच होरपळून मृत्यू झाला,आग एवढ्या मोठ्या प्रमाणात लागली असतांना,गावातील लोकांनी आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता आग विजवण्यासाठी प्रयत्न केले,आग विझवताना अनेक लोकांना किरकोळ इजा झाल्या,तोपर्यंत विनोद जयस्वाल यांच्या कुटुंबाची राखरांगोळी झाली होती,घरामध्ये संसार उपयोगी असलेली एकही साहित्य शिल्लक राहिलेले नव्हते,या आगीमुळे गावात भीतीचे वातावरण झाले होते,गावात ज्यां कुटुंबाच्याकडे गॅस आहे,त्यांनी आपल्या गॅस बॉम्बे गावाबाहेर आणुन ठेवले होते,आग विझवण्यासाठी अग्निशामक यांचा गाडी येवो पर्यंत आग यंत्र आली होती,



