सावळी सदोबा:- आशीफ खान
आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या माळेगांव परिसरामध्ये मागील अनेक दिवसापासून बिबट्याने हैदोस घातला असल्याने,शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,३ फेब्रुवारी रोजी एका शेतामध्ये,श्याम नारायण गजबे यांच्या मालकीची गाय शेत शिवारामध्ये चरण्यासाठी गेली असता,वन्यप्राणी बिबट्याने गायीवर हल्ला केला त्यात गाय जागीच ठार झाली ,ठार झालेल्या गाईचे मोठ्या प्रमाणात पशुपक्षी बिबट्याने लचके तोडले आहे,अशा घटनेमुळे पशुपालकाचे धेर्य खचत आहे होत या बिपट मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे,या घटनेत शेतकऱ्यांचे अंदाजे २५ हजार रूपयांचे नुसकान झाले आहे,मोठ्या प्रमाणात या परिसरात वन्यप्राणी बिबट्याकडून पाळीव जनावरावर हल्ला करून ठार मारण्याची प्रक्रिया निरंतर चालू आहेत,त्यामुळे माळेगांव येथील शेतकरी भयभीत झालेला आहेत,या घटनेची माहिती वनविभागाला दिली असुन,पंचनामा करून वनविभागाने मदत करण्याची मागणी वनविभाग परिक्षेत्र अधिकार्याकडे दिलेल्या निवेदनातून शेतकरी श्याम नारायण गजबे यांनी केली आहे.



