Home Breaking News गेल्या २४ तासात चार पुन्हा बाधित तर चार कोरोनामुक्त

गेल्या २४ तासात चार पुन्हा बाधित तर चार कोरोनामुक्त

10

गेल्या २४ तासात चार पुन्हा बाधित तर चार कोरोनामुक्त

यवतमाळ दि. ८ डिसेंबर
गेल्या २४ तासात जिल्ह्यात चार नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर चार जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 22 व बाहेर जिल्ह्यात तीन अशी एकूण २५ झाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण ५१४ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी चार अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित ५१० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये दोन रूग्ण यवतमाळ व दोन पुसद येथील असून त्यात एक महिला व तीन पुरूषांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ७२९५८आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या ७११४५ आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण १७८८ मृत्यूची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष ६८ हजार ९१६ चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष ९५ हजार ८७२ निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर ९.४९ असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.७८ आहे तर मृत्यूदर २.४५ आहे.

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 10 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1759 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 10 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 777 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

Copyright ©