उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी अवैध दारू तस्कराच्या मुसक्या आवळून, कारवाईचे पाऊल उचलावे असे जनते मधुन बोलले जात आहे.
मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी गावा जवळील अनेक गावामध्ये अण्णा नामक दारू तस्कर शेजारील वांजरी, सोनापूर, नांदेपेरा, वरोरा तालुक्यातील निलजई गावालगत परिसरात रोज मोठ्या संख्येने अवैद्य दारू विक्रीचा सपाटा मोठ्या प्रमाणात लावला असून, या अण्णा नामक तस्करावर मारेगाव पोलिस स्टेशन व उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे . सदर दिलेल्या गावांमध्ये अण्णा नामक दारु तस्कर शेकडो दारुच्या अवैद्य पेट्या कुंभा मार्गाने तस्करी करीत असल्याची गोपनीय माहिती हाती लागली आहे.या अण्णा नामक तस्करावर कोणाचा आशीर्वाद आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे अशा अवैधरित्या तस्करी करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळून ,त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी आजूबाजूच्या गावातून मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे. हा दारू तस्कर पोलीस प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन कित्येक वर्षापासून हा अवैध दारूचा धंदा करीत आहे. तरी त्या अण्णा नामक तस्करावर कार्यवाहीचा बडगा उगारून ,अण्णाच्या मुसक्या आवळून ,पोलीस प्रशासनाने दांडुक्याचा प्रसाद देऊन, योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी जनतेमधुन जोर धरत आहे.



