Home Breaking News उभ्या ट्रक ला धडक दुचाकीस्वार जागीच ठार

उभ्या ट्रक ला धडक दुचाकीस्वार जागीच ठार

13

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत हिवरी भांब ( राजा )या दोन्ही गावाच्या मधात टोल नाक्या जवळ आर्णी येथुन या यवतमाळ कडे येत असताना रस्त्याच्या बाजूला उभ्या ट्रक ला रात्री ११ वाजताच्या दरम्यान आर्णी कडून यवतमाळ कडे जाताना दुचाकी क्र. एम एच २९ ए झेड,४५१४ ,ने उभ्या असलेल्या ट्रक एम एच २६, बी,१३३५ ला जबर धडक दिली यात त्याचे डोके चिरले तर हात,पाय निकामी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला
नितीन हा आर्णी दिग्रस चहाचे मार्केटिंग करून घरी परत येत असताना हा दुर्दैवी अपघात झाला त्याचे माघे पत्नी सात वर्षाचा मुलगा आई लहान भाऊ असा परिवार असून तो सारस्वत चौक या परिसरात वास्तव्यास असल्याचं सांगण्यात आले या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस तपास करीत आहे

Copyright ©