Home Breaking News मानवी तस्करी आर्णी पोलिसांनी हाणून पाडली

मानवी तस्करी आर्णी पोलिसांनी हाणून पाडली

31

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीला फसविले

सोशल मिडियाच्या माध्यमातुन अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून मानवी तस्करी करणा-यांचा पर्दाफाश आर्णी पोलिसांनी दिनांक 1 ऑगष्टला केला आहे
आरोपी नामे दत्ता हिरामण राठोड वय वर्ष 27 व
अर्जुन गणेश आडे वय वर्ष 20 दोघेही रा. महादापुर ता माहूर जी. नांदेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
वरील आरोपींनी फेसबुकवर फेक प्रोफाईल फोटो ठेउन आयडी बनवीली.व त्या आयडी वरुन बँगलोर येथिल एका 16 वर्षीय अल्पवयिन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले व चॅटिंग दरम्यान मुलीकडून अश्लील फोटो बोलाविले त्यानंतर सदर मुलीला ब्लॅकमेल करायला सुरवात केली. ब्लॅकमेल करुन लग्नास तय्यार केले दिनांक 29 जुलै ला नागपुर ला बोलाविले व नागपुर वरुन आर्णीला घेउन आले.
शहरातिल ड्रीमलँड सिटी येथील एका 30 वर्षीय महिलेच्या घरी सदर मुलीला ठेवण्यात आले.
दुस-या दिवशी आरोपींनी मुलीला घेउन माहूर येथे एका लॉज वर गेले असता लॉजवाल्याने रुम भाडयाने देण्यास नकार दिला.
त्यानंतर ते परत आर्णी ला आले.
त्यांच्या वर शहरातील काही युवकांना संशय आल्याने त्या युवकांनी सदर माहिती आर्णी पोलिसांना दिली असता पोलिसांनी वरील आरोपींना पोलिस स्टेशनला घेउन आले व अल्पवयीन मुलगी ही बँगलोरची असल्याने बँगलोर पोलिसांना सदर माहिती देउन त्यांना पाचारण करण्यात आले बँगलोर पोलिस मुलीच्या नातेवाईकांसोबत आर्णी पोलिस स्टेशन गाठले असता वरील आरोपी व मुलीला आर्णी पोलिसांनी त्यांच्या ताब्यात दिले

 

*अल्पवयिन मुलीला आपल्या घरी ठेवणा-या महिलेचे बँगलोर कनेक्शन*

आर्णी शहरातील ड्रीम लँड सिटी मध्ये राहणारी ती 30 वर्षीय महिलेचे बँगलोर येथील एका बाबा सोबत कनेक्शन असुन त्या बाबानेच अल्पवयीन मुलिला त्या महिलेला दत्ता राठोड व अर्जुन आडे यांच्या माध्यमातुन फसविल्याचा आरोप अल्पवयिन मुलीच्या नतेवाईकांनी केला आहे
त्यामूळे आर्णी शहरात मानवी तस्करी करणारी टोळी सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे तसेच त्या महिलेचे परराज्यातील बाबा सोबत असलेले कनेक्शन याची सखोल चौकशी करण्याची गरज असुन या आधी आणखी किती मुलींना फसवीले व फसविले असल्यास त्यांच्या सोबत काय केले याचा उलगडा होणे आवश्यक आहे

Copyright ©