यवतमाळ दि.1 आॅगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले झाले आहेत.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 362 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह असून उर्वरित 360 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ॲक्टीव पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 15 व जिल्ह्याबाहेर दोन अशी आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72805 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71004 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.
आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये पुसद येथील एक व राळेगाव येथील एका रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यत 7 लक्ष 615 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 27 हजार 768 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.39 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.55 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2156 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 18 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2156 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 13 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 774 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 5 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 750 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.
_____________________________________
*जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन*
यवतमाळ दि. १; लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार व-हाडे व उपस्थित कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महसूल हा शासनाचा कणा
– जिल्हाधिकारी अमोल येडगे
यवतमाळ दिनांक १ आॅगस्ट : ०१ ऑगष्टपासून महसूल दिनाची सुरुवात होते. महसूल विभाग हा शासनाचा कणा असून महसूल विभागाने त्यांच्याकडील संपूर्ण महसुली कामे व नागरिकांच्या समस्या जबाबदारीपुर्वक सोडवून जनतेचा विश्वास सार्थक करावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केली.
आज महसूल दिनानिमित्त तहसील कार्यालय यवतमाळ येथे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे व उपविभागीय अधिकारी यवतमाळ अनिरुद्ध बक्षी उपस्थित होते.
महसूल दिनानिमित्त तहसिल कार्यालय यवतमाळ चे प्रांगणात जिल्हाधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार व-हाडे यांचे हस्ते वृक्षारोपन करण्यात आले, तसेच संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना व शेतकरी आत्महत्या केलेल्यांच्या वारसांना धनादेशाचे वितरण, निवडणूक ओळखपत्र, विविध शैक्षणिक प्रमाणपत्र, राशन कार्डाचे वाटप करण्यात आले.
यावेळी ३७ रक्तदात्यांनी रक्तदान करून महसूल दिन साजरा केला व वैद्यकीय तपासणी सुद्धा सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचा-यांनी करून घेतली.
कार्यक्रमाचे संचलन व आभार तहसिलदार
कुणाल झाल्टे यांनी केले.
या कार्यक्रमाला अजय गौरकार, राजेश कहारे, राजेश चिंचोरे, एकनाथ बिजवे, वकीला मस्के, सुनंदा राऊत, सर्व नायब तहसिलदार तसेच तलाठी मंडळ अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी
आरोग्य विभाग अधिकारी व सेतू कर्मचारी हजर होते.



