Home Breaking News गेल्या 24 तासात दोन पॉझिटिव्ह ; एक कोरोनामुक्त* जीएमसी, डीसीएचसी व खाजगी...

गेल्या 24 तासात दोन पॉझिटिव्ह ; एक कोरोनामुक्त* जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2153 बेड उपलब्ध

13

यवतमाळ दि.31 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर एक जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 787 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह असून उर्वरित 785 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ॲक्टीव पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 13 व जिल्ह्याबाहेर दोन अशी आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72803 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71004 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.
आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये घाटंजी येथील एक व नेर येथील एका रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यत 7 लक्ष 245 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 27 हजार 407 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.40 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.25 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2153 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 21 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2153 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 15 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 772 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 6 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 749 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

शासकीय तंत्रनिकेतन प्रवेशप्रकियेला 6आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ

यवतमाळ दि.३१ जुलै : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रकिया राज्यभरात ऑनलाईन पध्दतीने सुरु झालेली आहे. याची अंतिम मुदत दि. ३० जुलै २०२१ होती. परंतु प्रथम वर्षाच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला राज्य तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे दि. ६ आॅगस्ट २०२१ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. प्रवेशच्छुक विद्यार्थ्यांना www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून अर्ज नोंदणी करता येणार आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रकियेकरीता नोंदणी करुन प्रवेश अर्ज भरावे व वाढीव मुदतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. डी. एन. शिंगाडे यांनी केले आहे.

Copyright ©