Home Breaking News बासमती तांदळाच्या नावावर निकृष्ट तांदूळ विकणारी टोळी सक्रिय

बासमती तांदळाच्या नावावर निकृष्ट तांदूळ विकणारी टोळी सक्रिय

29

———————————————
यवतमाळ-परिसरात व तालुक्यात बासमती तांदळाच्या नावावर दाखवायचे एक व त्याआडून निकृष्ट दर्जाचा तांदूळ सर्वसामान्य जनतेच्या माथी मारणारी टोळी सक्रिय झाली आहे.
प्रथमतः च मेटाकुटीस आलेल्या जनतेला जिवन जगणे कठीण झाले आहे. अश्यातच आंध्रप्रदेश मधील काही संधी साधू व्यापारी बनून बासमती तांदूळ कमी भावात देण्याची बतावणी करून घरपोच चार चाकी वाहनाने फिरून भूलथापा देऊन दाखविताना वेगळा तांदूळ दाखवायचा आणि त्यामध्ये निकृष्ट तांदूळ पाला करून विकायचा आणि तातडीने पसार व्हायचे असा गोरख धंदा सरेआम सुरू आहे. यात सरळ ज्या भागात तांदूळ जास्त पिकतो व बासमती सारख्या तांदळाचा दुकान भावापेक्षा कमी दर म्हणत जनता बळी पडत आहे. आणि वास्तवात तांदूळ पाहतात तर वेगळाच तो पर्यंत हे भुरटे पसार झालेले असतात. एवढी मोठी फसवणूक होत असताना सुध्दा अजून पर्यंत एकाही ग्राहकाने काय पोलिसांच्या कचाट्यात जायचे झाले ते झाले म्हणून नुकसान व फसवणूक सहन करीत असल्याचे पुढे आले आहे. जास्तीत जास्त नफा कमविण्याच्या उद्देशातून ही टोळी सामान्य जनतेची फसवणूक करीत गोरगरिबांचे आर्थिक गणित बिगडवित आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा विभागाने या गंभिर बाबीकडे लक्ष घालून अश्या भुरट्या विक्रेत्यांवर पाळत ठेवून त्यांचे पायबंद करावे व त्यांना पोलीस विभागाच्या स्वाधीन करून जनतेच्या होणाऱ्या फसवणुकीपासून बचाव करावे अशी मागणी जनतेतून वर्तविली जात आहे.

Copyright ©