Home Breaking News जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा घसरला 24 तासात जिल्हयात 35 कोरोनामुक्त, 10 पॉझेटिव्ह,...

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा घसरला 24 तासात जिल्हयात 35 कोरोनामुक्त, 10 पॉझेटिव्ह, एक मृत्यू

12

 

जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 2186 बेड उपलब्ध

यवतमाळ, दि. 14 जून : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 10 जण पॉझेटिव्ह तर 35 जण कोरोनामुक्त झाले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 1083 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 10 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1073 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 445 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 105 तर गृह विलगीकरणात 340 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72564 झाली आहे. 24 तासात 35 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 70334 आहे. आतापर्यत जिल्ह्यात एकूण 1785 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 65 हजार 421 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 92 हजार 857 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.90 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.92 आहे, तर मृत्युदर 2.46 आहे.

पॉझेटिव्ह आलेल्या 10 जणांमध्ये 6 पुरुष आणि 4 महिला आहेत. यात आर्णी तालुक्यातील 1, दारव्हा येथील 1, दिग्रस तालुक्यातील 1, नेर 1, राळेगाव 1, यवतमाळ येथील 2, तर झरीजामनी येथील 1 तर इतर शहरातील 2 रूग्णाचा समावेश आहे.

आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेर शहरातील 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2186 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 93 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2186 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 44 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 533 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 39 रुग्णांसाठी उपयोगात तर 487 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 10 उपयोगात तर 1166 बेड शिल्लक आहेत.

_____________________________

पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा

यवतमाळ, दि. 14 : राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे दि. 15 व 16 जून रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि. 15 जून रोजी दुपारी 10 वाजता शासकीय विश्रामगृह येथे वाशिमहून आगमन व यवतमाळ शहर वाढीव पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना व महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाचा आढावा. सकाळी 11 वा. वनविभागाच्या अधिकाऱ्यासंमवेत शासकीय विश्रामगृह येथे बैठक. दुपारी 12 ते 2 राखीव. दुपरी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे कोव्हीड-19 नियंत्रण व उपाययोजना संदर्भात आढावा बैठक व संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या पूर्वतयारीचा आढावा. दुपरी 3 वा. पोलीस मुख्यालय येथे डायल-112 प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या मोटर सायकल व पोलीस पेट्रोलींग वाहनांचा लोकार्पण कार्यक्रम, पोलीस मेस विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन व खनीज विकास निधीतून खरेदी करण्यात आलेल्या तसेच शासनाच्या आरोग्य खात्यामार्फत प्राप्त रूग्णवाहिकेचे लोकार्पण तद्नंतर नूतनीकरण केलेल्या पोलीस ऑफीसर क्लब इमारतीचे उद्घाटन. सायंकाळी 4 वाजता यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन निर्मिती प्लांट, लिक्वीड ऑक्सीजन टँक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये कोवीडबाधीत लहान मलांच्या उपचारासाठी तयार करावयाच्या कक्षाची पाहणी. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

बुधवार दिनांक 16 जून 2021 रोजी सकाळी 7.30 वा. शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथून नागपूरकडे प्रयाण.

________________________________

आदिवासी विकास प्रकल्पाच्या विविध योजनांचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

यवतमाळ, दि. 14 जून : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा, यांचेतर्फे सन 2021 -22 या वर्षात विशेष केंद्रीय सहाय्य योजना, आदिम जमातींचे संरक्षण तथा विकास (सीसीडी) पारधी पॅकेज योजनेंतर्गत विविध योजनेकरीता दिनांक 29 एप्रिल 2021 रोजी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिध्द करून प्रस्ताव आमंत्रीत केले होते. परंतु सदर कालावधीत लॉकडाऊन व जिल्हाबंदी असल्याने काही संस्थांनी सदर प्रस्ताव या कार्यालयाच्या व्हॉटस्ॲप वर किंवा ई-मेल वर सादर केलेले आहेत. सद्यस्थितीत कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्याने सदर योजनांचे प्रस्ताव सादर करण्यास पुढील 5 दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे.

तरी यापूर्वी ज्या संस्थांनी कार्यालयात व्हॉटस्अप ॲप किंवा ई-मेल वर प्रस्ताव सादर केलेले असल्यास असे प्रस्ताव ग्राह्य नसून त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन कोविड-19 प्रतिबंधबाबत देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करून आपल्या येाजनेचा प्रस्ताव कार्यालयात सादर करावा. तसेच नवीन संस्थांना जाहिरातीमध्ये दिलेल्या योजनेचा प्रस्ताव सादर करावयाचा असल्यास त्यांनी पुढील 5 दिवसात आपल्या संस्थेचा प्रस्ताव कार्यालयात सादर करावा. त्यानंतर आलेले प्रस्ताव ग्राह्य राहणार नाही, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी कळविले आहे.

_____________________________

अवसायानातील संस्थाप्रकरणी 15 दिवसात आक्षेप कळवा

यवतमाळ, दि. 14 : यवतमाळ तालुक्यातील पुढील संस्था अवसायानात काढण्यात आल्या असून सदर संस्थांची नोंदणी रद्द करण्यापूर्वी संस्थेचे धनको व ऋणको तसेच सभासदाकडून काही आक्षेप हरकती असल्यास 15 दिवसाचे आत संस्थेचे संबंधीत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ किंवा संस्थेचे अवसायक यांचेकडे सादर कराव्यात.

अवसायानातील संस्थांमध्ये ग्रामीण कर्मचारी सहयोग गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, दक्षता गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, स्टेट बँक लक्ष्मी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, आदर्श गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, पारिजात गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, प्रभात गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, आनंद गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, पंचशिल गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, शास्त्रीनगर गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, विद्या विहार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. उमरसरा, उदय गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, स्व. संजय गांधी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, शिवराम गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, श्रमीक पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, श्री. बालाजी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, नेताजी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, अंबिका गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, शिवराज गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, विद्या गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, विद्या गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, होलसेल क्लॉथ गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, गुरुनानकसिंग गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक कर्म. गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, नागसेन गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, सरस्वती गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, प्रणील गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, या संस्थांचा समावेश आहे.

उक्त कालावधीत कोणतेही आक्षेप, हरकती प्राप्त न झाल्यास कोणाला काहीही म्हणण्याचे नाही असे गृहीत धरून संस्थांनी नोंदणी रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल, असे सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक यांनी कळविले आहे.

______________________________

प्रवासी ऑटोरिक्षाचालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदान

लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आवाहन

 

यवतमाळ दि. 14 : कोरोना संसर्गामुळे आर्थिकदृष्ट्या बाधित झालेल्या जिल्ह्यातील तीन चाकी प्रवासी ऑटोरीक्षा परमीट धारकांना एक वेळचे 1 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान शासनाने 7 मे 2021 रोजी जाहीर केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तीन चाकी प्रवासी ऑटोरीक्षा परमीट धारक ज्यांचे दिनांक 15 डिसेंबर 2015 नंतर परवाने वैध आहेत, त्यांनी www.transport.maharashtra.gov.in येथे ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावे.

ही योजना प्रवासी ऑटोरीक्षा करीता आहे खाजगी ऑटोरीक्षा व इतर वाहन धारकांनी अर्ज करू नये. अर्ज करतांना परवाना धारकाचा जन्म दिनांक हा आधार व अनुज्ञप्ती वर सारखा असावा. एलओआय (इरादापत्र) नंतर परवाना साठी अर्ज केला नाही त्यांनी परवाना फी चा भरणा करून परवाना प्राप्त केल्यानंतर अर्ज करावा. चुकीचे अर्ज सादर केले असल्यास दुरूस्तीसाठी कार्यालयात अर्ज करावा व जास्तीत जास्त ऑटोरीक्षा परमीट धारकांनी सानुग्रह अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वाढोकर यांनी केले आहे.

______________________________

क्रिडा सवलतीचे गुणप्राप्तीसाठी 21 जूनपुर्वी प्रस्ताव सादर करा

यवतमाळ दि. 14 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परिक्षेचे आयोजन अनुक्रमे दिनांक 29 एप्रिल ते 20 मे व 23 एप्रिल ते 21 मे 2021 या कालावधीत करण्यात आले होते. सदर परीक्षेसाठी कोविड-19 या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन पत्र दि. 28 मे 2021 अन्वये 2020-21 या वर्षात माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता 8 वी, 9 वी, मध्ये सदर विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा व सदर विद्यार्थ्यांस सन 2020-21 करीता गुण देण्यात यावेत. तसेच सन 2020-21 या वर्षात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इ.12 वी पूर्वी इ. 11 वी मधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा व सदर विद्यार्थ्यांस सन 2020-21 करीता गुण देण्यात यावेत तसेच सदर सवलत ही केवळ सन 2020-21 च्या परीक्षेकरीताच देय राहील असे कळविले आहे.

त्यानुसार सन 2020-21 या वर्षात इ.10वी व इ.12 वी च्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळण्याबाबतचे क्रीडा प्रस्ताव सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी शाळा /कनिष्ठ महाविद्यालयामार्फत संबंधीत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव विहीत नमुन्यात सादर करावयाचा शनिवार दिनांक 12 जून ते 21 जून 2021, संबंधीत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी संबंधीत विभागीय मंडळाकडे प्रस्ताव व यादी सादर करावयाचा मंगळवार दिनांक 15 जून ते 25 जून 2021 असा आहे.

उपरोक्त मुदतीत कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही. तरी याबाबत सर्व मुख्याध्यापक / प्राचार्य, माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये शिक्षक, विद्यार्थी, पालक व इतर सर्व संबंधीत घटकांनी नोंद घ्यावी. अधिक माहिती करिता क्रिडा अधिकारी त्रिवेणी बांन्ते यांचेशी भ्रमणध्वनी क्रमांक 9975590232 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रिडा अधिकारी उमेश बडवे यांनी कळविले आहे.

________________________________

माहे जून मधे महिला लोकशाही दिन नाही

इ-मेल वरील अर्जाचे होणार निराकरण

यवतमाळ दि. 14 : यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने महिन्यातील तिसऱ्या सोमवार 21 जून रोजी आयोजित जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन आता होणार नाही. तथापी dwomenchild@yahoo.com या ईमेलद्वारे अर्ज स्विकारून त्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे.

जिल्हा महिला लोकशाही दिन महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केला जातो तसेच तालुकास्तरावर महिला लोकशाही दिन हा दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी आयोजित केला जातो. तक्रारग्रस्त महिलांनी त्यांच्या तक्रारी प्रथम तालुकास्तरावर तहसिलदार यांचेकडे मांडाव्यात. सदर तक्रारीवर संबंधीत विभागाकडून नेमून दिलेल्या कालावधीत तक्रारीचे निरसन झाले नाही तेव्हाच सदर तक्रार ही जिल्हा महिला लोकशाही दिनात तालुकास्तरीय लोकशाही दिनात केलेले अर्ज व टोकन क्रमांकासह दाखल करण्यात येते.

न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राची प्रती न जोडलेला अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी मांडू नये. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे. तक्रारग्रस्त महिलांनी आपल्या तक्रारी इ-मेल वर पाठवाव्या असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

 

_________________________________

जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

यवतमाळ, दि. 14 : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियमातील तरतुदी अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात 30 जून पर्यंत जमावास बंदी राहणार आहे.

या आदेशान्वये जिल्ह्यात जमाव करणे, शस्त्र बाळगणे, माणसांचे एकत्रिकरण व पुतळ्याचे प्रदर्शन करणे आदी प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे. या कलमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 37 (1) व 37 (3) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हा दंडाधिकारी ललितुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

Copyright ©