Home Breaking News हीवरी येथे अस्वलीच्या आगमनाने कुठे कुतूहल तर कुठे भीती

हीवरी येथे अस्वलीच्या आगमनाने कुठे कुतूहल तर कुठे भीती

11

हिवरी येथे प्रथमच पन्नास वर्षां नंतर जंगली अस्वलाचे आगमन जेतवन प्रयटन स्थळी झाल्याने गावात सर्वत्र तरुणाई मध्ये अस्वलीला पाहायचे कुतूहल निर्माण झाले होते
जेतवन एक सुप्रसिद्ध श्रध्दास्थान असुन या ठिकाणी सायंकाळी 8 वाजताच्या दरम्यान जेतवन येथे राहत असलेल्या दोन युवकांना अचानक अस्वलचा सामना झाला तिला पाहताच त्यांनी पळ काढला व वनविभागाचे अधिकारी प्रशांत बहादुरे यांना या घटनेची माहिती
जेतवन चे संचालक गौतम बनसोड यांनी सूचना देताच
लगेच आपल्या टीम सोबत घटना स्थळ गाठताले तर अस्वल दरवाजा मध्ये बसून दिसले काहीं काळ तिच्यावर पाळत ठेवली एका तासाने ती गावाजवळ 2 की.मी.अंतर कापून टाक्यावर पाणी पिण्यासाठी आली काहीं मुळे रस्त्यांनी जात असता त्यांना ती दिसली आणि त्यांनीही आरडाओरडा करत गावात अस्वल आल्याचे सांगण्यात आले अनेक झन ब्याटऱ्या काठ्या घेऊन तिचा शोध घेत होते आणि ती एका शेतात आराम करीत असल्याचे काहीं जागलीला जाणाऱ्या शेतकऱ्यांना दिसली तेव्हा वनविभागाचे अधिकारी कर्मचारी आणि उपसरपंच अभिजित मूरखे, विनोद कैथवास,अमोल चौधरी, गंगाधर मांजरे,नीलेश शहारे,कुणाल राऊत,ऋषभ माहुरे इत्यादींनी अस्वलिला जंगलाच्या दिशेने काढून दिले,

जेतवन पर्यटन स्थळ हिवरी ता.जि यवतमाळ येथे देशविदेशातून हजारो बोद्धउपासक या ठिकाणी येतात व या तपभूमीत द्यान करतात. त्यामुळे ही भूमी पवित्र असून या ठिकाणी अनेक प्राणी रात्रीला पाहण्यात मिळते. सदर हिंस्त्र प्रान्यानी आज पर्यंत कोणालाही या ठिकाणी त्रास दिला नाही.
सदर ठिकाणी जेतवनचे संस्थापक रमेशजी बनसोड यांनी प्राण्यांसाठी जेतवन परिसरात पाणी पिण्याकरिता पाणवठे तयार केले आहे तसेच या प्राण्यांना जंगलांमद्धे काही खायला मिळत नसल्यामुळे त्यांच्यासाठी यवतमाळ येथून भाजीपाला,कडधान्ये इत्यादींची सोय करतात.
काल दि ०२/०६/२०२१ गुरुवार रोजी जेतवन पर्यटन स्थळांमध्ये अस्वलाच्या दर्शन झाले. ही अस्वल दोन दिवसांपासून जेतवन पर्यटन स्थळातच मुक्काम असल्याचे त्यांनी सांगितले.

Copyright ©