Home Breaking News शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला पंखे व स्ट्रेचर भेट* *शिवसेना जिल्हा संघटक शैलेश गाडेकर...

शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला पंखे व स्ट्रेचर भेट* *शिवसेना जिल्हा संघटक शैलेश गाडेकर यांचा पुढाकार*

12

 

सध्या सर्वत्र कोरोना आजाराचा प्रकोप सुरू आहे.त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण येत आहेत.हे सर्व रुग्ण रुग्णालयात दाखल होणे आधी फिवर ओपीडी येथे तपासणी करिता येतात.ह्या ठिकाणी रुग्ण संख्या वाढल्यामुळे व सध्या उन्हाचा पारा वाढला असल्याने येथे रुग्णांना खूप त्रास होत आहे.नेमकी ही अडचण लक्षात घेऊन शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक शैलेश गाडेकर व सौ ताराबाई पुखराज कोचर यांनी स्वयंसपूर्तीने वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे फिवर ओपीडी येथे दहा स्टँड फॅन,पाच स्ट्रेचर व अपंग रुग्णांकरिता दोन व्हील चेयर आज भेट म्हणून दिल्या.ह्या सर्व भेटवस्तू वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुउग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मिलिंद कांबळे व डॉ सुरेंद्र भुयार,डॉ चव्हाण,डॉ मानकर व श्री मुकेश ब्राह्मणे यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.ह्या प्रसंगी शिवसेना वाहतूक सेना जिल्हा संघटक शैलेश गाडेकर,शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,महिला आघाडी जिल्हा संघटिका कल्पना दरवई, शिवसेना बोरी शहर प्रमुख रवी जाधव,निलेश लडके, रुग्ण सेवक बजरंग बायस्कर,मनोज दातार,विशाल चव्हाण,अक्षय खुपट व जय सोडा आदी उपस्थित होते.

*बॉक्स*

*रुग्णांचे आवश्यकते अनुसारे अजून साहित्य भेट म्हणून देणार*

शिवसेना पक्ष ऐंशी टक्के समाजकारण आणि आवश्यक तेथे वीस टक्के राजकारण करणारा पक्ष आहे.उन्हाळ्यात फिवर ओपीडी येथे रुग्णाची गैरसोय लक्षात घेऊन तेथे पंखे,स्ट्रेचर व व्हील चेयर उपलब्ध करून दिल्या आहेत.त्याच प्रमाणे मर्च्युरी येथे सुद्धा स्ट्रेचर व पंखे भेट म्हणून दिले आहेत.आवश्यकता पडल्यास अधिक साहित्य भेट म्हणून देण्याचा आमचा मानस आहे.शासकीय वैद्यकीय रुग्णालयात गोर गरीब रुग्णांवर विनामूल्य उपचार होत आहेत.माझे सोबत सामाजिक कार्य करण्यास इच्छुकांना सुद्धा रुग्ण उपयोगी कार्य करण्यास आम्ही विनंती करणार आहोत.

Copyright ©