महामार्ग पोलीसांची कार्यवाही
सागर मुडे
यवतमाळ/पांढरकवडा/करंजी :–
राज्यमहा मार्ग न ७ च्या वाढत्या अपघाताला आळा बसावा तसेच वाहन चालकाला शिस्त लागावी या करिता करंजी रोड येथे हायवे पोलीस चौकी स्थापित करण्यात आली अशातच हायवे पोलिसांनी वर्षभरात जानेवारी ते डिसेंबर पर्यंत 40 ते 50 हजाराच्या वरती केसेस केल्या असून पोलिसांनी मोटर वाहन कायद्याअंतर्गत तब्बल सव्वा दोन कोटींचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे पत्रकार शक्ती ला सांगण्यात आले, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वाढते अपघात रोखण्याकरीता अपघात ग्रस्ताना मदत व्हावी भरधाव वाहन चालकांवर शिस्तीची लगाम लागावी या करिता हायवे पोलीस नेहमी तपरतेने कार्य करत आहे जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020पर्यंत वाहतूक नियम तोडणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात आल्या आहे या मध्ये ई चालक वाहन चालविण्याचा परवाना नाही सीटबेल्ट च वापर न करणे हेल्मेट च वापर न करणे अति वेगाने वाहन चालवणे लेन कटींग नो पार्कींग च्या 40 हजार 220 केसेस केल्या आहे यातून हायवे पोलिसांनी 2 कोटी 21 लाख 76हजार 100 रुपये दंड सुद्धा वसूल केला अपर पोलीस महासंचालक वाहतूक मुंबई पोलीस अधीक्षक महामार्ग प्रादेशिक विभाग नागपूर यांच्या मार्ग दर्शना खाली करंजी हायवे चौकीचे प्रभारी अधिकारी संदीप मुपडे पी एस आय विनोद तिवारी ए एस अनिल चौहान विकास खडसे फुलसिग राठोड सुभाष राठोड दुर्गा प्रसाद मिश्रा सर्व पोलीस कर्मचारी यांनी ही कार्यवाही केली



