- सोंखास हेटी येथील अंगणवाडी सेविकेकडून बालकाच्या आहाराची हेराफेरी मागील अनेक महिन्या पासुन होत असल्याची माहिती ग्रामस्थांना होतीच परंतु कोणत्याही प्रकारचा सबळ पुरावा मिळत नसल्याने तशी नजरेत त्यांचे वर पाळत होतीच या गैरप्रकारा मुळेअंगणवाडीतील आहाराची सतत हेराफेरी होत असल्याने पालक व ग्रामस्थ त्रस्त झाले होते येथील सेविकेने अंगण वाडीतील आहार मागील दोन ते अडीच महिन्या पासुन एका घरा ठेवण्यात आला होता तो आहार त्या ठिकाणावरून हलावताच न आल्याने त्याचा दुर्गंध येत होता या प्रकरणाची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी येथील पोलीस पाटील दिनेश रामदास पारधी यांना बोलाऊन अंगणवाडी सेविकांच्या अनेक दिवसापासून होत असलेल्या गैर प्रकारांची माहिती दिली व हा आहार त्यांच्या नजरेत आणुन दिला या प्रकरणी संबधित अधिकाऱ्यांना तक्रार करून त्याचेवार कार्यावाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले



