यवतमाळ:
राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र निपा नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यावर आधारित ऑनलाईन कोर्स Programme on School Leadership and Management PSLM तयार करून देशातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकाना प्रशिक्षण दिले जात आहे,
प्रशिक्षण इंग्रजी हिंदी मराठी असामी कन्नड, गुजराती भाषेत उपलब्ध आहे पण प्रशिक्षण उर्दू माध्यमातून नसल्याने उर्दू माध्यम शाळेतील मुख्याध्यापकांना अडचणी होत आहे, प्रशिक्षण उर्दू माध्यमातून उपलब्ध करून देण्यात यावा अशी मांगणी उर्दू टीचर्स एसोसिएशन यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष सय्यद इरफान पटेल यांनी निवेदनातून केली,
सदर प्रशिक्षण महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद यांनी प्रशिक्षणाचे भाषांतर व संदर्भीकरण करून राज्यातील मुख्याध्यापकांसाठी उपलब्ध करून दिले पण प्रशिक्षण उर्दू माध्यमातून नसल्याने यात उर्दू माध्यमाच्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्या समोर अडचणी निर्माण झालेल्या आहेत,
महाराष्ट्र राज्यात एकूण 5 हजार पेक्षा जास्त उर्दू माध्यमाच्या शाळा असून एकूण अंदाजे 18 लाख विद्यार्थी शिक्षण घेते,
सदर प्रशिक्षण उर्दू माध्यमातून उपलब्ध असणे आवश्यक आहे जेणेकरून जास्तीत जास्त मुख्याध्यापक प्रशिक्षण प्राप्त करेन व ऑनलाईन कोर्सचा लाभ त्यांना मिळेल,
शालेय नेतृत्व व शाळा विकास आराखडा तयार करण्यास लाभदायक असा प्रशिक्षण PSLM कोर्स राज्यातील जास्तीत जास्त उर्दू माध्यमाच्या शाळेतील मुख्याध्यापकांना याचा लाभ घेता यावा म्हणून सदर प्रशिक्षण कार्यक्रम कोर्सचे उर्दू भाषांतर व संदर्भीकरण करून उर्दू माध्यमातून उपलब्ध करून देण्यात यावा अशी मांगणी निवेदनातून करण्यात आली,“



