आर्णी (प्रतिनिधी): आर्णी शहरात काल स्थानिक पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून एकूण 3 आरोपींवर कारवाई करून एकूण 1 लक्ष 44 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक 14 ला दत्तरामपूर येथील शेतात सायंकाळी 7 वाजता जुगाराच्या डावावर धाड टाकून नामदेव लक्ष्मण वाघमारे (60) रा. दत्तरामपूर, वाहिद अली अझहर अली (65), रा. मुबारक नगर आर्णी, देवानंद देवराव खठरे (43) रा. दत्तरामपूर यांना ताब्यात घेतले. घटना ठिकाणा वरून गंजी पत्ते, नगदी 6300 रुपये व तीन मोटार सायकल अंदाजे किंमत 1 लाख 38 हजार रुपये असे एकूण 1 लाख 44 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 12 अ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात सतिश चौधर करीत आहे,
टीप
एखादा जुगाराच्या कार्टून फोटो टाकावा
____________________________



