Home Breaking News उभ्या ट्रक ला जोरदार धडकेत एकीचा जागीच मृत्यू तर दुसरी गंभीर जखमी

उभ्या ट्रक ला जोरदार धडकेत एकीचा जागीच मृत्यू तर दुसरी गंभीर जखमी

16

 

टीविशन ला जात असतांना दोन
बहिणीचा अपघात, एकीचा जागेवरच मृत्यू तर दुसरी गंभीर,जखमी

यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत भाब राजा येथील टोल नाक्या जवळ उभ्या ट्रक ला जबरदस्त धडक दिल्याने एकीचा जागीच मृत्यू झाला ,बेचखेडा येथुन यवतमाळ येथे जात असताना सकाळी दहा वाजताच्या दरम्यान दोन्ही बहिणी दुचाकीने यवतमाळ कडे जाताना उभ्या ट्रकला दुचाकीने जबर धडक दिली यात रोशनी चंदन गुप्ता वय १६ हिचा जागीच मृत्यू झाला तर राणी चंदन गुप्ता वय १४ ही गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने यवतमाळ रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सांगण्यात आली असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे

Copyright ©