Home Breaking News सेंट जोसेफ इंग्लिश हायस्कूलच्या कु.रिदा अबरार खान हिचे सुयश

सेंट जोसेफ इंग्लिश हायस्कूलच्या कु.रिदा अबरार खान हिचे सुयश

25

सेंट जोसेफ इंग्लिश हायस्कूलच्या कु.रिदा अबरार खान हिचे सुयश

🔸असलम अंजुम🔸

बुलढाणा :  येथील सेंट जोसेफ इंग्लिश हायस्कूलच्या इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु.रिदा अबरार खान (वय १४ वर्षे) हिने महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान मॉडेल मेकिंग स्पर्धा २०२६ मध्ये प्रथम पारितोषिक मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे.
शिवाजी सायन्स कॉलेज, चिखली येथे दि. २० फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून त्यात २०० पेक्षाही अधिक विज्ञान मॉडेल्सचे सादरीकरण करण्यात आले होते. कु.रिदा अबरार खान हिने “AI स्मार्ट मिरर असिस्टंट” या प्रकल्पासाठी हे यश संपादन केले आहे. हे मॉडेल अत्यंत नाविन्यपूर्ण, उपयुक्त व व्यवहार्य असल्याचे मत परीक्षकांनी नोंदविले असून परीक्षक व उपस्थित प्रेक्षकांकडून कु. रिदा ची मुक्तकंठाने प्रशंसा करण्यात आली. तिची ही उल्लेखनीय कामगिरी शाळा, पालकवर्ग तसेच जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून ती आपल्या यशाचे श्रेय वर्गशिक्षक, प्राचार्य आणि आपल्या आई – वडिलांना देते.

Copyright ©