Home Breaking News तरुण युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

50

तरुण युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी अकोला बाजार : वडगाव जंगल पोलिस स्टेशन अखत्यारीत येत असलेल्या कामठवाडा येथे राहत्या घरी एका तरुण युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता उघडकीस आली.

बादल अरुण चव्हाण वय 22 वर्ष रा. कामठवाडा असे मृतकाचे नाव असून त्याने आपल्या राहत्याच घरी सायंकाळी ४ वाजता गळफास घेतला,ही बाब कुटुंबाच्या लक्षात येताच कुटुंबियांनी लगेच यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी बादल चव्हाण याला मृत घोषित केले. वृत्त लिही पर्यन्त मृत्यूचे कारण काळू शकले नाही.

Copyright ©