Home Breaking News अवैध रेती तस्करी करणाऱ्यावर कार्यवाही करा,शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

अवैध रेती तस्करी करणाऱ्यावर कार्यवाही करा,शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

12

महागाव ता. प्र.निलेश नरवाडे

अवैध रेती तस्करी करणाऱ्यावर कार्यवाही करा,शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

महागाव तालुक्यातील काळी दौ. शेत शिवारातील शेत सर्वे न.१६१/१, १६२/१ अ आणि १६२/२ मधील सामायिक नाल्यातून रात्री बेरात्री काही रेती तस्कर ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेती तस्करी करत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या दोन्ही थड्याची माती घसरुन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आधीच नैसर्गिक अपत्तीने आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकरी आता या रेती तस्करामुळे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अश्या रेती तस्करावर कार्यवाही करून शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानी पासून वाचविण्याच्या मागणीचे निवेदन शेतकरी वनदेव राजराम मोरे आणि परमेश्वर सीताराम राऊत यांनी दिले महागाव तहसीलदार यांनी काळी दौ. येथे पेट्रोलिंग वाढवावी असे .परिसरातील नागरिकांची मागणी आहे

Copyright ©