जयकुमार ग्यानचंद वाधवाणी यांचे हृदयविकाराने निधन
येथील पी वाधवानी फार्मसी कॉलेज चे अध्यक्ष व यवतमाळ नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष जगदीश वाधवानी यांचे लहान बंधू जयकुमार ग्यांनचंद वाधवानी यांचे वयाच्या 55 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्याचे मागे एक मुलगा, एक मुलगी व धर्म पत्नी भाऊ गुरमुख वाधवानी जगदीश वाधवानी विष्णू वाधवानी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे त्याच्यावर आज दिनांक तीन नोव्हेंबर 2023 रोजी पांढरकवडा रोडवरील हिंदू स्मशानभूमीत संध्याकाळी अंतिम संस्कार करण्यात आले त्यांची अंतिम यात्रा दारव्हा रोड येथील हॉटेल गायन्सन जवळील निवास स्थानावरून निघाली अंतिम यात्रेत शहरातील व्यापारी बांधव. सिंधी समाज बांधव संस्थाचालक. प्राध्यापक वृंद विध्यार्थी व राजकीय क्षेत्रातील गनमान्य नागरिक उपस्थित होते



