प्रतिनिधी धीरज शेरकर
हिवरी ते वाटखेड रस्त्याची झाली चाळणी,रस्ता अपघातास देत आहे आमंत्रण
यवतमाळ तालुक्यातील हिवरी नजिक असलेल्या हीवरी वाटखेड रस्त्यांची आश्रम शाळा चौफुलीपासून ते वाटखेड पर्यंत रस्ता वाहन धारकांसाठी व पायदळ चालणाऱ्या नागरिकांसाठी व शाळेच्या विद्यार्थांसाठी त्रास दायक ठरत आहे हा रस्ता पुर्णपणे उखडल्याने रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे कळेना वाहनंधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे अशातच आश्रम शाळाचे अंतर एक ते दीड की. मी. आहे गावात वाहतुकीचे सादन नसल्याने गावातली विद्यार्थी व नागरिकांना पायदळ चालण्यास हा रस्ता त्रास दायक ठरत आहे अपघाताच्या भीतीने रस्त्याच्या ऐवजी वाहने रस्त्याच्या बाजूला चालवण्याची वेळ आली गावातली नागरिकांनी रस्त्यानं मुळे या रस्त्याने खनिज भरून टिप्पर ची ये जा सतत चालू असल्याने येथील रस्त्यांना इतके वजन सहन होत नाही कारण रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे असल्याने रस्ता उखडायला वेळ लागत नाही त्या मुळे या रस्त्याने मरण यातना भोगाव्या लागत आहे अतिशय त्रास दायक रस्त्याकडे प्रशासनाने दखल घेऊन हा रस्ता त्वरित दुरूस्त करून देण्याची मागणी गावातली नागरिकांनी केली विद्यार्थ्यांनी केली आहे.



