वीज कर्मचाऱ्याचा डि पी ला शॉक लागून मृत्यू
जोडमोहा : शेळी खोरद येथे विजेची डी पी येथे काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने वायरमनचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जोडमोहा शेळी खोरद परिसरात रविवारी 5 वाजता च्या सुमारास घडली.
अमोल गंगाधर हिवरकर (39 रा तळेगाव शिवानी असे त्या मयत वायरमनचे नाव आहे जोडमोहा शेळी खोरद देवनळा आदी भागातील विजेचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे दैनंदिन काम सुरु होते. 5 वाजेच्या सुमारास ते विजेची डि पी येथे आपले काम करीत असताना अचानक विजेचा प्रवाह सुरु झाला आणि क्षणार्धात त्यांना काही कळायच्या आत विजेचा झटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून अमोल हिवरकर यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील,लहान भाऊ,पत्नी, दोन मुली,असा परिवार आहे



