शासकीय रुग्णालयात मनमानी कारभार,मृत्यू चां दाखला मागणाऱ्या स पोलिसांकडून मारहाण
यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात मनमानी कारभार मोठ्या प्रमाणात सुरू असून 3ऑक्टोंबर रोजी मृतक राजू श्रीराम सरोदे यांच्या मृत्यू चे प्रमाण पत्र मागण्यास गेलेल्या दोन तरुण तासनतास वाट पाहून बेजार झाले पाच वाजता येथील कर्मचारी आले त्यांना मृत्यू चां दाखला मागितला त्या दोघांना परिचय विचारला यात वैभव उत्तम कारमोरे वय 25 याच्या माऊशी चे पती असल्याचे सांगितले या वरून चोकांडे नामक यांनी वैभव व त्याचा मित्र उत्तम डोमाजी जाधव वय 24 रां.लोणी महागाव या दोंघावर चांगलेच बरसले या वरून तू तू मैं मैं झाली आणि तेथील कर्मचार्यांनी पोलिसांना पाचारण करून या दोघांना चांगलाच प्रसाद दिला व आत टाकण्याचा दम हि दिला.तर यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते फोनच उचलत नाही येथील रुग्णालयात अनेक कर्मचारी हजरच राहत नसल्याने अनेक रुग्णाचे हाल होत आहे या रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे संपूर्ण कामे रुग्णाच्या नातेवाईकांनाच करावे लागते स्टेचर पासून तर वॉर्ड मध्ये ने आन करण्याचेही काम नातेवाईकांना च करावे लागते येथील एकाही कर्माच्याऱ्यावर कुणाचेही वचक नाही लोकप्रतिनिधी तर या प्रश्नावर चर्चा करतच नाही एकाही वरिष्ठांचे लक्ष नसल्याने सर्व सामान्यांचे हाल होत आहे याची त्वरित दखल घेऊन सर्व सामन्याची दखल घेण्यात यावी अशी मागणी केल्या जात आहे.



