Home Breaking News येरद येथे कर्जबाजारी शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

येरद येथे कर्जबाजारी शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

9

येरद येथे कर्जबाजारी शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

जोडमोहा यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येरद येथील मनोज कवडु राठोड वय ३७ वर्ष असून त्याचे मागे आई वडील पत्नी,आणि चार मुली असा मोठा परिवार असल्याने यांचे पालन पोषण करावे तर कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच बडोदा बँकेचे व खाजगी कर्ज बाजारी झाल्याने शेतातील निंदण,खुरपन करण्यासाठी पैसे नव्हते पिक तोंडाशी आले पैसे मागावे तर कुणाला कुणी पैसे द्यायला तयार नाही तर घरात अन्नाचा कण नाही जगावं, तर कसे हा प्रश्न निर्माण झाल्याने पर्याय उरला नसल्याने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी शासनाने त्वरीत दखल घेऊन आत्महत्या ग्रस्त कुटुंबाना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी गावकरी यांच्या कडून करण्यात येत आहे.

Copyright ©