जोडमोहा येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोडमोहा येथील रहिवासी एका २९ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार उशिरा रात्री घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.
जोडमोहा रहिवासी आशिष वसंता वालदे वय २९ वर्ष या युवकाने मंगळवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आई – वडील घरी नसल्याचे पाहून त्यांनी घराचा टिनाचा अँगला गलाफस घेतला या प्रकरणाची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी जोडमोहा गावातील पोलिस पाटील यांना माहिती दिली व त्यांनी ग्रामीण पोलिसांना सांगितले. यावरून ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून प्राथमिक माहितीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.



