Home Breaking News पूरग्रस्तांनी अडविला राष्ट्रीय महामार्ग 

पूरग्रस्तांनी अडविला राष्ट्रीय महामार्ग 

14

पूरग्रस्तांनी अडविला राष्ट्रीय महामार्ग 

यवतमाळ जवळच असलेल्या वाघाडी येथील पूरग्रस्तांना शासनाची मदत अजून प्रयंत न मिळाल्याने येथील पुरपिडीत यांना उपाशापोटी दिवस काढावे लागत आहे २१ जुलै रोजी झाल्या ढग फुटिने वाघाडी वाशियांचे संसार उध्वस्त झाले तर एका महिलेचा मृत्यू झाला अन्न धान्य कपडे पूर्णतः वाहून गेले झोपायला चादर ना अंगावर कापड,राहिले असल्या प्रकारची दैनीय अवस्था असतानाही शासन झोपेतच असल्याने त्यांना जाग करण्यासाठी हा पवित्रा घ्यावा लागला असल्याने आंदोलक आक्रमक झाले याची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन वाघाडी वाशियाना आवश्यक ती मदत त्वरित देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. ३ते ४ दरम्यान एक तास रस्ता बंद केल्याने शेकडो वाहने अडकले होते अनेकांची या ठिकाणी वाताहात होत होती

Copyright ©