प्राथमिक आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभार,अतिवृष्टी असताना अधिकारी,कर्मचारी कर्तव्यावर नाही
एक नर्स मुख्यालयी ,बाकी आपापल्या घरी,
जिल्हा आरोग्य अधिकारी हाकलतो उंटावरून शेळी.
हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी घरूनच आपला कारभार सांभाळत असल्याने गावाला वाऱ्यावर सोडले आहे.शनिवारी महापुराने गावाला वेढा घातला होता अनेक घरात पाणी शिरले,काही विहिरी पुराच्या पाण्याने भरल्या गावात अशुद्ध पाणी आणि वैद्यकीय विभागाचा एकही कर्मचारी गावात नाही तीन ते चार कर्मचारी घरून आलेच नाही.रुग्णालयात दहा वाजता पासून येण्यास सुरुवात होते आणि एक वाजता पासून कर्मचारी घरी जाण्यास सुरुवात होते. येथे कोटी रुपये खर्च करून निवास स्थान बांधण्यात आले त्या मध्ये राहायला अधिकारी,कर्मचारी नाही,एकच नर्स मुख्यालयी राहते इतर निवास स्थाने ओस पडली आहे.रुग्णालयात सी.सी.टिव्ही बसविण्यात आले ते ही बंद करून ठेवण्यात आले थम मशीन लावली तिलाही निकामी केली.यातच येथील कर्मचाऱ्यांची मिली भगत असल्याने एकमेका सहाय्य करू एकाला पाठऊ त्याचा फोन आला की मी गावात गेलो,पेशंट ला पाहण्या करिता,दुसरा कारण सांगतो जेवायला तिसरा सांगतो चहा घ्यायला एक मेकांना वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्या जातो आणि तो यशस्वी होतो,अनेक कर्मचारी गैर हजर असताना जिल्हा अधिकारी यांनी यांचे हजेरी बुक घेऊन गेले एकावरही कारवाई न करता परत दिले.आज पर्यंत अनेक तक्रारी झाल्या एकाही कर्माच्याऱ्यावर कारवाई करण्यात आली नाही यांच्या मनमानी कारभारांमुळे रुग्णाचे हाल होत आहे हिवरी येथे शंभर घरात पाणी गेले अनेक कुटुबांची वाताहत झाली अशी परिस्थिती असतानाही एकही कर्मचारी गावात फिरकला नाही केवळ आशा नी घरोघरी गोळ्याचे वाटप केले,आशा फिरत असताना शासकीय अधिकारी डॉक्टर,मलेरिया कर्मचारी नर्स यांनी गावात फिरणे गरजेचे होते,तसे बंधन कारक असतानाही शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत घरी परत ले अशा मनमानी कारभाराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.आरोग्य केंद्र असतानाही कुणालाच वेळेवर सुविधा मिळत नाही किंबहुना आरोग्य विभागाला सर्व सामान्यांच्या आरोग्याची जान कधी होईल असा सवाल करण्यात येत आहे. आरोग्य अधिकारी हे नावापुरते झाले आहे फोन केला तर उचलत नाही उचलला तर तालुका अधिकारी यांचे शी बोलण्याचा सल्ला देऊन फोन बंद करतात आणि तालुका आरोग्य अधिकारी दखल घेत नाही एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था आरोग्य विभागाची झाली आहे.



