Home Breaking News मुसळधार पावसाने शेतकरी हतबल,शेकडो हेक्टर वरील पिके झाले निकामी

मुसळधार पावसाने शेतकरी हतबल,शेकडो हेक्टर वरील पिके झाले निकामी

12

मुसळधार पावसाने शेतकरी हतबल,शेकडो हेक्टर वरील पिके झाले निकामी

यवतमाळ तालुक्या अंतर्गत हिवरी अकोला बाजार मंडळातील शेकडो हेक्टर क्षेत्रावर पाण्याचा कहर झाल्याने नाल्या काठावरी जमिनी तर खरडून गेल्या इतर ठिकाणच्या जमिनीतील पाणी साचले,तर शेताच्या बाजूने काढण्यात आलेल्या नाल्या फुटून शेतात पिके वाहून नेली असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सर्वच शेतात टाकण्यास आलेले बांध फुटल्याने ते पाणी शेतामधून वाहून निघाले जेम तेम कशाबशा पेरण्या आटोपल्या अनेकांचे पिक नुकतेच वर आले आणि या मुसळधार पावसाने चक्क पिके मातीमोल केल्याने पुरता शेतकरी हतबल झाला आहे.पुन्हा पेरणी करणे तर शेतकऱ्यांना शक्य नाही आणि शासनाची तुटपुंजी मदत शेतकऱ्याला तारू शकत नाही कारण शेतीची मशागत,पेरणी,खत,फवारणी मजुरी यातच असलेनसले पैसे लाऊन पिकाची जोपासना केली अन् मुसळधार पावसाने सर्व काही माती मोल केलं या करिता शासनाने एकरी पन्नास हजाराची मदत केल्यास शेतकरी तग धरू शकतो याची शासनाने दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी वर्गा कडून करण्यात येत आहे.

अनेक घराची पडझड

येथील अनेक घरांच्या भिंती पडल्या,अनेक घरात पाणी शिरले,शेकडो घरे पावसात ओली झाली,अनेक सिमेंट घराचे छत सुद्धा गळणे सुरू झाले आहे त्या मुळे जन जीवन विस्कळीत झाले आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुरक्षा भिंती मधून पाणी शिरले आणि दुसरी कडून निघाले, वाटखेड नाका पार्डी रस्ता बंद,हिवरी मध्ये जाणारा बाय पास रस्ता पुरामुळे बंद झाला,गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले.याची दखल घेत तलाठी रवींद्र डवले हे सकाळी 7 वाजता येऊन पुर ग्रस्त भागाची पाहणी केली.

Copyright ©