प्रतिनिधी:- महागांव कसबा
स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय महागांव कसबा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करून,महीला व बालविकास क्षेत्रात काम करणाऱ्या, सामाजिक कार्य करणाऱ्या, बालविवाह प्रतिबंध,हुंडा निर्मुलन, लिंग चिकित्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महीला सक्षमीकरण, महीला स्वयं सहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता यांसारख्या कामात पुढाकार घेणाऱ्या गावातील महीलांना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला सन्मान पुरस्कार”देवून सन्मानित करण्यात आले. त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
सदर पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच किशोर बिहाडे, प्रमुख उपस्थिती वैभव दुधे ग्रा.प.सदस्य,आर.ए.जाधव ग्राम विकास अधिकारी याची होती.शासन परीपत्रानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला सन्मान पुरस्कार दोन महीलांना देणे शासनाने आदेशित केले. त्या प्रमाणे महागांव कसबा ग्रामपंचायत ने विविध पद्धतीने वर नमुद महीलासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या तब्बल सहा महीलांचा पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.त्यामध्येम मंगला संसारे, संगिता पाईकराव, मिनाक्षी बिहाडे,सिमा फुसांडे, सुनिता धवने, अश्विनी गौरकार या महीलांना सरपंच किशोर बिहाडे यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी मंचावर वैभव दुधे ग्रामपंचायत सदस्य, आर.ऐ.जाधव ग्राम विकास अधिकारी,आशा सेविका रेखा केळतकर,पुजा भोजने ,अक्षय बदुकले ग्रामपंचायत लिपिक, ज्ञानेश्वर खुरसडे कर्मचारी, निशांत राणे संगणक परीचालक सोबतच महीला व ग्रामस्थ उपस्थित होते.



