अज्ञात गौमाते च्या तस्करां कडून भागवताचार्य जाधव महाराजांवर जीव घेण्या हल्ला
लाडखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सोनखास लासिणा या गावच्या मधात सायकाळी 8 वाजताच्या दरम्यान ट्रक मध्ये गायी असल्याचे भागवताचार्य संतोष जाधव महाराज यांनी या बाबत विचारणा केली असता गौमाते च्या तस्करी करणाऱ्या पाच ते सहा झनानी जाधव महाराज यांचे वर हल्ला करण्यास सुरुवात केली ,हा हल्ला सुरू असताना तेथून जाणारे बंजारा युवक धावून गेले असता ते मारेकरी ट्रक घेऊन पळाले तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संतोष जाधव महाराज यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले हा हल्ला इतका होता की महाराज यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली तर डावा हात निकामी झाला या पूर्वीही धामणगाव मार्गावर गौमातेची तस्करी करणाऱ्यानिच ट्रक अडविल्याने हल्ला झाला होता या वेळी शेतात काम करणाऱ्या मजुरांनी त्यांना वाचविण्यास मदत केली होती,सद्या गौमातेची तस्करी दारव्हा ,अमरावती,आर्णी मार्गे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आज पर्यंत पोलीस प्रशासनाने या मार्गावरील एकही गौमातेची तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई केलेली नाही कारण पोलिसांचे मोठ्या प्रमाणात हित संबंध असल्याने कारवाई होत नाही होते ती बजरंग दलानी,अथवा जनतेने पकडलेल्या ट्रक वर तेही नाम मात्र, त्या मुळे गौमातेची तस्करी खुले आम् केल्या करण्यात येते हे विशेष.



