लाडखेड प्रतिनिधि :अन्सार खान
आज दि.२६ में २०२३ शुक्रवार रोजी बोरी अरब येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ची सभापती व उपसभापती पदाची निवडणुक पार पडली , महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजय भाऊ राठोड व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस तथा यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष वसंत भाऊ घुईखेडकर यांच्या नेतृत्वा खाली सभापती पदी विराज वसंतराव घुईखेडकर व उपसभापती पदी विकास वसंतराव क्षिरसागर यांची अविरोध निवड झाली तसेचे व्यापारी हमाल व अडते यामध्ये विवेक विश्वासराव घुईखेडकर दिलीप ज्ञानेश्वरराव गांवडे व सुशिल शिवशंकर ठोकळ यांची अविरोध संचालक पदी निवड करण्यात आली होती कृषी उत्पन्न बाजार समिती चे नव निर्वाचित संचालक म्हणून गोंविद वामनराव राऊत गजानन विजयराव कावरे मोहन भगवान जाधव सतीष पुंडलिकराव शेटे अक्षय शिवशंकर ठोकळ धमेंद्र गोंविदराव दुधे रोहन अशोकराव जयस्वाल विलास पुंडलिकराव दुधे विनोद वसंतराव गुल्हाणे नरेंन्द्र सुदाम तिवारी मिलिंद तुळाशीराम रामटेके कोमलताई किशोरराव चारोळे ज्योतीताई लंकेश्वर जाधव यांची संचालक पदी निवड झाली.



