धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून युवकाचा खून
विठोली (मारुती) शेतशिवारातील घटणा
दिग्रस तालुक्यातील विठोली(मारुती) येथील एका युवकाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना आज दिनांक २ एप्रिल ला सकाळी सुमारे 11 वाजताच्या दरम्यान घडली.
मृतक सार्थक दीपक गावंडे वय अं १८ वर्ष हा युवक आपल्या शेतामध्ये मका कापण्याकरिता गेला होता. तो शेतामध्ये गेल्यानंतर लगेच अर्ध्या तासाने वडील शेतामध्ये गेले असता त्यांना मुलगा सार्थक हा मृत अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे त्याचा मेंदू बाहेर पडला होता. खून झाल्याची घटना गावात पसरतात गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहे.



