वर्धा प्रतिनिधी पंकज तडस
कर्ज बाजिरी व सततच्या नापिकने तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या
वायगाव येथील तरुण शेतकऱ्याने घरी कुणी नसल्याचे पाहून छताच्या पंख्याला गळफास लावून जीवन यात्रा संपवली आत्महत्या करणारा तरुण शेतकरी प्रवीण विठ्ठल नगराळे वय ४१ रां.वायगांव (नि) वार्ड नं ०४
जी. वर्धा. असे मृतक शेतकऱ्यांचे नाव आहे.
सवि असे की मागील दहा वर्षा पासून शेतीचा संपूर्ण कारभार हातात घेऊन प्रपच्याचा गाडा चालवत असताना मागील तीन वर्षां पासुन सतत ची नापिकी व कर्जाचा वाढता डोंगर सतत त्याच्या मनाला भेडसावत होता, घरातील प्रत्येकाच्या गरजा कशा पूर्न करायच्या मुलांचे शिक्षण कसे करायचे स्टेट ब्यांकेचे ,इतर खाजगी कर्ज कशाने फेडायचे असे अनेक विचार करत असल्याचे परिवाराकडून सांगण्यात आले, याचे मागे पत्नी दोन मुले,दोन भाऊ,एक बहिण व आई वडील इत्यादींची जबादारी सांभाळत असताना कंटाळून आत्म हत्या केली असल्याचे बोलल्या जात आहे.शासनाने याची त्वरित दखल घेऊन तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.



