वर्धा प्रतिनिधी पंकज तडस
सरपंचाकडे शिपायचा पदभार ?
अंतरगाव ग्रामपंचायतीतील प्रकार
सेलू तालुक्यातील अंतरगाव ग्रामपंचायतीमधे नव्यानेच नियुक्त झालेल्या शिपायापासून ग्रामपंचायत कार्यालयाची चाबी कुठलाही ठराव न घेता सरपंचाने स्वतः कडे घेतल्याने सिपायाचा पदभार सरपंचाने घेतला काय? अशा प्रकारच्या चर्चेला ग्रामस्थामधे चर्चिल्या जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नुकतेच नवीन सरपंचासह सदस्याची निवड होऊन नविन कार्यकारिनीने पदभार स्विकारला. तसेच एक सुशिक्षित महिला सरपंच ग्रामपंचायतीला मिळाले म्हणून ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त सुद्धा करण्यात येत होते. परंतु ग्रामपंचायत अंतरगाव येथे काही महिन्यापुर्वीच शिपाई पदावर नियुक्ती झालेल्या कर्मचारी कडून ग्रामपंचायत कार्यालयाची चाबी कुठलाही ठराव न घेता फक्त आकसापोटी महिला सरपंचाने शिपायाकडून स्वतः कडे घेवून माझ्या घरी चाबी नेण्यासाठी व ठेवण्याकरिता यावे म्हणून अलिखीत आदेशच दिल्याचे टाकळी येथील जनता दरबारात समजले, सदर महिला सरपंच ग्रामपंचायत कार्यालयाला स्वतःची मालमत्ता तसे शिपायाला स्वतःचा नोकर समजत असल्याचे सुद्धा ग्रामस्थांकडून बोलल्या जात आहे.
सदर शिपाई पदावर असलेल्या व्यक्तीची आई सरपंच पदाकरिता ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान सरपंचाविरोधी निवडणुकीत उभी असल्याकारणाने त्यांचाच राग म्हणून की, काय सदरचा केविलवाणा प्रयत्न महिला सरपंचाकडून होत असल्याचे बोलल्या जात आहे.
ठराव बुक सरपंचांच्या घरीच
नवीन कार्यकारिणीने पदभार स्विकारायला परंतु सभेचे ठराव पुस्तकच पंधरा पंधरा दिवस सरपंच घरी नेवून ठेवत असल्याचे काही सदस्यांकडून सांगण्यात येते.
म्हणून चाबी घेतली – सरपंच शंभरकर
सदर प्रकानाबाबत अंतरगावच्या सरपंच किर्ती शंभरकर यांना विचारणा केली असता ‘ ग्रामपंचायतीमधे रात्री नऊ दहा वाजेपर्यंत बेकायदेशीर कामे चालतात तसेच कोणीही झेरॉक्स काढतात’ म्हणून मी चाबी माझ्याकडे घेतली, असे मत व्यक्त केले.



