Home Breaking News सासरच्यांना कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून गूढ उलगडले

सासरच्यांना कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून गूढ उलगडले

8

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

सासरच्यांना कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून गूढ उलगडले

घाटंजी: शहरातील मारोती महाराज वॉर्ड येथे माहेरी असणाऱ्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. हर्षा संकेत मैद ३२, रा. अमरावतीअसे मृतक विवाहितेचे नाव आहे. तिने मृत्यूपूर्वी चिठ्ठीत सासरच्यांना कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले. याप्रकरणी मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरात मृद व जलसंधारण कार्यालयात कार्यरत असणारी हर्षा हिने गळफास लावून आत्महत्या केली. हर्षाचे वडील बाहेरगावावरून घरी आले असता सदर घटना उघडकीस आली. या घटनेची फिर्याद भाऊ विक्की गणेश चौधरी रा. मारोती महाराज वॉर्ड, घाटंजी यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात दिली… पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठवून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. २१ फेब्रुवारी रोजी हर्षाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तर भावाच्या फिर्यादीवरून पती संकेत बाबाराव मैद व सासू मायाबाई बाबाराव मैद यांच्यावर भादंवि ३०६ ४९८ (अ ) ३४ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पतीच्या चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आल्याचे कळते. मृतक हर्षा हिने यापूर्वीसुद्धा सासरकडून शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याचे घरी सांगितले होते. मात्र तिने लिहिलेल्या मृत्यूपूर्व चिठ्ठीत सर्व हकिकत लिहिल्याने घटनेतील गूढ उलगडले आहे. या घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार साहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा बावीस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नागरगोजेंसह पोलीस करीत आहे..

Copyright ©