प्रतिनिधी
महागाव तालुक्यातील गुंज येथील प्रताप नत्थुजी जाधव याचा मृत देह मनपुर शिवारात मदेव येथेअसल्याची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन ला मिळताच पोलीस उपनिरीक्षक गोपाल उताणे, रुपेश नेवारे,घटास्थळी दाखल होऊन प्रेत पाहणी करून ते प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले मृतका जवळ विषाची बॉटल,दारूच्या बाटल्या आढळून आल्यानी प्राथमिक अंदाज हा आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे मात्र उत्तरीय तपासणी अहवाल आल्यावरच मृत्यूचे खरे कारण कळेल असे पोलीस सुत्रा कडून सांगण्यात आले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक किशोर जुनंघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.



