Home Breaking News *घरफोडी करणाऱ्या आरोपीस ग्रामीण पोलिसांनी केले २४ तासात गजाआड*

*घरफोडी करणाऱ्या आरोपीस ग्रामीण पोलिसांनी केले २४ तासात गजाआड*

30

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सावर गड येथील ३० नोव्हेंबर ला चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी तातडीने दखल घेऊन चोरीचा तपास सुरू केला यात दोन संशितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संशयितच गुन्हेगार निघाले यात
पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण Cr.No 822/22 कलम 454,457,380 भादवी अन्वये घरफोडीचा गुन्हा दिनांक 30/11/ 22 रोजी दाखल करण्यात आला
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता सावर गड येथील दोन इसमांनी सदर चोरी केल्याचे उघड झाले सदर आरोपींना ताब्यात घेऊन काल रात्री दरम्यान सखोल चौकशी करून त्यांच्या घराची झडती घेऊन गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल (किराणा सामान किमती अंदाजे दहा हजार रुपये 11700)हस्तगत करण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा पीसीआर मागण्यात आला असून त्यांना तीन दिवसाचं पीसी आर दि
5/12/2022 पर्यंत मंजूर केला आहे अटक असलेल्या आरोपीं अमर सुरेश डोंगरे वय 28 वर्ष शैलेश दामोदर शिरभाते वय 29 वर्ष दोन्ही रा.सावरगड अशी असून गुन्ह्यात चोरी गेलेला इतर मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्याची कार्यवाही सुरू आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ यांचे मार्गदर्शनात पो. नि किशोर जुनघरे ठाणेदार यवतमाळ ग्रामीण पीएसआय अमोल ढोकणे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर मातकर, राजु तुतारे,अविनाश वाघाडे हे करीत असून काही गुन्हे उघड होईल या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे

Copyright ©