रामनगर (रुई ) येथील उत्तम राठोड चा पुरात वाहून मृत्यू
ग्राम पंचायत रुई अंतर्गत भौजा रामनगर तांडा येथील रहिवासी उत्तम भावसिंग राठोड वय (६५) वर्ष. हे दिनांक १२-१०-२०२२ बुधवार रोजी बाजार करून घरी परत येत असताना हिवरी मनदेव नाला ओलांडत असताना अचानक लोडा आल्याने तो पुरान वाहून गेला होता. त्याचा शोध पासून सुरु होता. आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान त्याचा मृतदेह बोरी रस्त्याच्या पुलजवळ गाळात अडकून असल्याचा गावातील युवकांना दिसून आला. पोलिसांना महीती देता पोलिस पोलिसांनी घटणास्थळी पंचनामा करुन मुतदेह यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात शविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मुटदेह चार रामनगर येथे अग्निसंस्कार करण्यात आला. उत्तम राठोड यांच्या मृत्यु पश्चात त्यांना पत्नी विमलबाई, मुलगा संतोष व बाबु असा परिवार आहे. त्यांचे कुटुंबियानी शासना कडे अनुदान मिळण्याची मागणी केली आहे,



