यवतमाळ /पुरुषत्तंम कामठे
यवतमाळ येथील एकावर हल्ला,तर दुसरा कळंब येथील झालेल्या मारहाणीत गंभीर
येथील प्रवीण उर्फ पऱ्या केराम वय २५ वर्ष याचेवर काही तरुणांनी धारधार शस्त्रांनी हल्ला करून गंभीर जख्मी केल्याची घटना १० .४५ च्या दरम्यान घडली तर याच वेळात कळंब तालुक्यातील म. बोरी येथील नरेश वामन मोहरले वय ३५ वर्ष याच्या चेहऱ्यावर जबर वार केल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना जिल्ह्यात घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावर निर्माण झाले आहे.
या दोघांना हि शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे प्रवीण उर्फ पऱ्या हा करण परोपटे यांच्या खुनातील आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे तर रुग्णालयातील तणाव निर्माण झाला असून पोलिसाचा कडकं बंदोबस्त लावण्यात आला आहे या दोन्ही प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.



