यवतमाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे केवळ व्यापाऱ्याचे राज्य असुन शेतकऱ्यांना, व त्याच्या मालास कवडी मोलाचिही किंमत नसल्याचे गुणवत ठोकळ या शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली.कृषी उत्पन्न बाजार समिती हि सध्या व्यापाऱ्यांच्या नियंत्रणात असल्याने संपूर्ण परिसरात व्यापाऱ्यांनी आपला माल ठेवलेला आहे,त्या मुळे येथे येणारा शेतकऱ्यांचा माल ठेवायला जागा उरलेली नसल्याने शेतकऱ्याला कुठेही किंमत राहिलेली नसल्याचे ठोकळ यांनी मत वेक्त केले,या बाजार समिती मध्ये अनेक वेळा तक्रारी केल्या तर आज डोळंबा येथील शेतकरी सुरेश ढेकळे यांनी येथील सभापती यांनाही या समस्या बाबत भ्रमण ध्वनी वरुन सांगण्यात आल्या परंतु त्यावरही काही तोडगा निघाला नसल्याने या व्यापाऱ्याची मक्तेदारी कधी थांबेल असा सवाल शेतकऱ्या कडून करण्यात येत आहे. प्रथमच शेतकरी सतत संकटाचा सामना करीत कसे बसे आपले पीक वाचवत बाजार समिती मध्ये विकावयास आणतो आणि इथेआणल्यावरही त्या माळावर टपून बसलेले राक्षस गिळंकृत करतो जिकडे तिकडे शेतकऱ्याना लुटण्यातच येते त्याला वाचवणारा मात्र या भू तलावर दिसत नाही हे मात्र तितकंच खरं आहे.



