महागाव येथील पुरात वाहून गेलेल्या महिलेचा शोध लागता लागेना !
महागाव कसबा येथे काल २६ जुलै ला झालेल्या मुसळधार पावसाने नाल्याच्या पुरात एक महिला वाहून गेल्याची घटना घडली या घटनेने सर्वत्र हळहळ वेक्त करण्यात येत आहे या दुर्दैवी घटने मुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे हि घटना
दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला यात नाल्याला मोठा पूर आल्यामुळे महिला वंदना प्रकाश जाधव वय ५२ हि या पुराच्या ओढ्याने वाहून गेली हिला एक मुलगा दोन मुले असून याचे छत्रच हरवले असल्याने यांच्या आंकाताने संपूर्ण गाव शोधण्याचा प्रयत्न करीत आहे हि महिला पुरात वाहून गेल्याची माहिती वाऱ्या सारखी गावात पसरल्याने संपूर्ण गाव तिला शोधण्यात लागले परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नसल्याने गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे येथील ग्रामस्थानी सर्व परिसर पिंजून काढला असून अजून पर्यंत या महिलेचा शोध लागला नसल्याने शोध सुरूच आहे



