प्रतिनिधी आकोली सचिन चावरे
माळेगाव ठेका येथील शेतातील गोठ्याला लागली भीषण आग
सुदयवाने गोठ्यात बांधून असलेली बैल जोडी बचावली,मात्र शेती साहित्य व कूटार जळुन खाक.
नजीक असलेल्या माळेगाव (ठेका) येथिल शेतकरी शेषेराव विठोबा लेंडे यांच्या शेतातील गोठ्याला भीषण आग लागली.27एप्रिल ला साधारणतहा दुपारी 3.00वाजता ही घटना घडली प्राप्त माहितीनुसार, आगीत 70 स्पिरिकलर पाईप 2इंजंन, बैल बंडी,वखर नागर व कूटाराचा ढिग अशाप्रकारे शेती साहित्य व चारा जळुन राख रांगोळी झाला आहे. .लेंडे यांच्याकडे साडे पाच एकर शेती समर्थ रामदास विद्यालय या शाळेला लागुन आहे शेतीला लागूनच वन विभागाची जमीन आहे त्या वनविभागाच्या जागेतून पेट घेत आग शेतात शिरली असावी अशी शंका शेतकरी व गावकरी व्यक्त करित आहे. शेतातील गोठ्यात दुपारच्या सुमारास बैल जोडी बांधून व आपले शेतीतील काम संपऊन जेवन करण्यासाठी शेतकरी लेंडे घरी आले होते मात्र अचानक शेतातील गोठ्यातून आगीचे लोंढे निघायला लागले मात्र गोठ्यात बांधून असलेली बैल जोडी आधी बैलला बांधून असलेल्या दोर जळाल्याने सुदैवानी बैल बचावली मात्र गोठा जळाल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.



