किन्ही येथील तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू
यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत जंगदबा कॉलेज जवळी दुचाकी क्र.एम एच २९ झेड ६२२२ ने यवतमाळ कडे जात असताना रुपेश प्रकाश खडके वय २२ या तरुणाचा अज्ञात वाहनाने दुपारी १२ वाजताच्या दरम्यान धडक दिल्याने अपघात झाला यात हा युवक जागीच ठार झाला जंगदबा कॉलेज ते बायपास या मार्गांनी नाईलाजास्तव विरुद्ध दिशेने वाहने येतात त्या मुळे अनेक अपघात झाले आणि होत आहे राष्ट्रीय महामार्गावर चुकीच्या नियोजनामुळे अनेकांचे बळी जात आहे ज्या ज्या ठिकाणी बायपास देण्यात आले ते नियम बाह्य असल्याने असे बळी जात आहे गावाच्या रस्त्या पासून दोन की.मी.अंतरावर बायपास दिल्या गेला असल्याने प्रत्येक वाहन धारकांना विरुद्ध दिशेने आपले वाहन टाकावे लागते यातच वाहन धार्काचे नाहक बळी जात आहे याची मात्र कुणीही दखल घेत नाही,आणि निरप्राध्याना प्राणास मुकावे लागते,या चुकीच्या नियोजनात अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे प्रशासन याची कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे आणखी किती बळी गेल्यावर प्रशासनास जाग येईल असा सवाल केल्या जात आहे.



