गोळी मारून कुऱ्हाडीने घाव घालून माझी सरपंच सुनील डिवरे याची हत्या
यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत भांब राजा येथील माझी सरपंच सुनील नारायणराव डीवरे वय ३५ यांची सायकाळी. ७ वाजताच्या दरम्यान देशी कट्टा चां वापर करून दोन गोळ्या झाडण्यात आल्या तर डोक्यात कुऱ्हाडीचे वार करण्यात येऊन हत्या केल्याची घटना घडली या वेळी तीन मारेकरी असल्याचे सांगण्यात येत आहे सुनील हे शिवसेनेत सक्रिय असल्याने येत्या पंचायत समितीचे दावेदार होते कृषी उत्पन्न बाजार समिती साचलंक म्हणून तर मागील पंचवार्षिक मध्ये सरपंच होते दोन्ही पदावर दहा वर्षापासून सेवेत असल्याने ग्रामपंचायत मध्ये संपूर्ण उमेदवार निवडून आणले आणि पत्नी अनुप्रिया. डीवरे हिला सरपंच बनून गावाचे नंदनवन करण्याचे सप्न होते गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी अनेक वेळा चक्का जाम आंदोलने करून गावातील अनेक विकासात्मक कामे केली या सर्कल मधील एक सुपरिचित वेक्तींत्व होते या घटनेने संपर्ण गाव शोकाकुल झाले असून अनेक गावांमध्ये हळहळ वेक्त करण्यात येत आहे.



