आर्णी प्रतिनिधी सय्यद अक्रम
आर्णी शहरात एका पन्नासवर्षीय महिलेचा मृत्यू नेमका कशाने? शहरात उलटसुलट चर्चेला उधान
रिव्हॉल्व्हर चोरी झालेले घर आमने सामने
आर्णी:- चार दिवसापूर्वी सैन्य दलातील माजी अधिकारी यांची सात राउंड असलेली रिव्हॉल्व्हर अज्ञात चोरट्यांनी लंपास केलाचा रीपोर्ट चार दिवसापूर्वी आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होतो त्यावरुन सदर रिव्हॉल्व्हर चोरी नेमकी कोणी व का? केली या घटनेचा तपास सुरू असतांना आज फिर्यादी प्रभु केशवराव गव्हाणकर यांच्या घरासमोरच सकाळी 8:30 वा दरम्यान आशा किसन पोरजवार वय 55 वर्षची महीला घरात पुजा करत असंताना चक्कर येवुन पडल्याने रक्तस्त्राव झाल्याची चर्चा पसरल्याने सदर महिलेला तीचा मुलगा अरविंद याने व सुन सरोज हिने लगेच आर्णी येथिल शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथुन प्राथमीक तपासणी केली असता अत्यवस्थ असलेल्या आशाबाईला लगेच यवतमाळ येथिल जिल्हा शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आल्याने त्यांचा तीथे पोहचल्यावर उपचारा दर्म्यान मृत्यू झाला त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आल्याने त्यानंतर प्राथमीक अंदाज डॉक्टरांनी दिल्याने घटनेचा तपास सुरु झाला आज चार वाजताच्या दर्म्यान दारव्हा येथिल पोलीस उपविभागीय अधिकारी अखिलेश मिरखेलकर व आर्णी चे पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांनी घटना स्थळावर जावुन प्रभु गव्हाणकर यांच्याकडे चौकशी करत आणखी माहीती जाणून घेतली त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक भुजबळ पाटील बातमी लिखानकरे पर्यंत सर्व अधिकारी घटणा स्थळावर कसुन चौकशी करत होतो चोरी झालेले रिव्हॉल्व्हर व आज सकाळी झालेला महिलेचा मृत्यू यात साम्य आहे का? याची दुपार पासुन पोलीस चौकशी करत असतांना आढळुन आले



