पहा आज यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 24 तासात किती जण कोरोना बाधित
यवतमाळ दि. 14 जानेवारी –
गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यात 108 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 32 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 457 व बाहेर जिल्ह्यात 22 अशी एकूण 479 झाली असून त्यातील 55 रूग्ण रूग्णालयात तर 424 गृहविलगीकरणात आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1397 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 108 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 1289 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 73577 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71310 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या 108 रूग्णांमध्ये 30 महिला व 78 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात तीन, बाभुळगाव एक, दारव्हा चार, दिग्रस नऊ, कळंब पाच, मारेगाव एक, नेर 18, पांढरकवडा तीन, पुसद आठ, वणी तीन, यवतमाळ येथील 48 व इतर जिल्ह्यातील पाच रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आठ लक्ष 30 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 25 हजार 938 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.20 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 7.73 आहे तर मृत्यूदर 2.43 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1714 बेड उपलब्ध :
यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 55 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1714 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 54 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 733 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 1 बेड उपयोगात असून 754 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.



