कार्यकारी संपादक राजू चव्हाण
घाटंजी तहसिल कार्यालयात शॉट सर्किट मुले लागली आग
———————————————-
सुदैवाने तातडीने आग आटोक्यात आणण्यास यश
———————————————-
घाटंजी- आज आठवड्याचा पहिला दिवस कर्मचारी वर्ग येवून नेहमी प्रमाणे आपापल्या कामकाजास सुरवात केली तोच एवढ्यात अचानक तहसिलदार यांच्या दालना पुढील हॉल मधील भिंती मधील विद्युत प्रवाह असलेल्या बोर्ड मध्ये अचानक शॉट सर्किट होवून आग लागली.
तहसिल कार्यालयाच्या पुरातन इमारतीत विद्युत प्रवाह असणारे साहित्य सुध्दा जुने झाले आहे. त्याच सोबत नवनवीन तंत्रज्ञान उपकरणे बसविण्यात आले आहे यात यावर मोठा भार पडत असल्याने ही आग लागली असावी असा अंदाज लावला जात आहे. अचानक लागलेल्या आगीने कार्यरत कर्मचारी गोंधळून गेले होते. पण प्रसंगावधान राखत त्यांनी सर्व प्रथम भिंती लगत ठेवून असलेल्या रेकॉर्ड चे रॅक व कपाट हटविले व नंतर अग्निशमन च्या बब चा आधार घेवून आग विझविली यात त्यांना यश आल्याने मोठी हानी टळली. तहसिल कार्यालयातील त्या हॉल मध्ये आगीच्या धुरामुळे पूर्ण फरशीवर धूर पसरला होता. त्यामुळे येथिल कामकाज प्रभावित झाले होते.



